पृथ्वीतलावरील मनुष्यप्रजाती ही जरी गुणसूत्राने ने एकच
असली तरी प्रदेशानुरूप त्यांची शरीराची ठेवण, त्वचेचा रंग वेगळा असतो. हवामान, अधिवासाच्या फरकाने हे वेगळेपण दिसून येते. मात्र जशीजशी
मानवप्रजाती मध्ये उत्क्रांती होते गेली, विकास
होत गेला तसे मानवाने आपल्या प्रजातीला राष्ट्र, धर्म-पंथ, जात-पात अशा बाबींचा मुलामा देऊन त्यात आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला. पक्षीप्रजातीमध्येसुद्धा
अधिवासानुसारच वेगळेपण आढळते. फक्त दोघांत फरक हा की पक्षांमध्ये हे वेगळेपण आपली
प्रजाती जिवंत राहण्यासाठी जपल्या जाते.
गवताळ
माळरानावरील खाटीक (shrike)
प्रजातीमधील राखी खाटिक (Southern-grey shrike) हा असाच आपल्या अधिवासाच्या वेगळेपणामुळे लक्षात
राहतो. भारतात एकूण अकरा प्रकारचे स्थानिक व स्थलांतरीत खाटिकच्या प्रजाती आढळतात.
खाटकासारखे मांस टांगून ठेवण्याच्या सवयीमुळे shrike ला मराठीत खाटीक असे म्हंटले जाते. हे बरेचदा भुकेपेक्षा
जास्त शिकार केल्यावर किंवा मिलनकाळात मादीला प्रलोभन दाखविण्यासाठी केले जाते. रंगाचा
जर विचार केला तर सर्व खाटीक प्रजातीमध्ये प्रामुख्याने विटकरी रंग हा असतोच. पण नावाने
जरी राखी खाटिक असला तरी आपल्या पांढर्याशुभ्र रंगाने हा लक्षात राहतो. जणू विटकरी
रंगाची मक्तेदारी मोडून काढण्यासाठीच त्याने हा रंग परिधान केला असतो. शेपटी, पंख, चोच, पाय काळ्या रंगाची असतात. आणी
सर्व खाटीकांसारखी डोळ्यावर काळी पट्टी असते. ती फक्त ईतरांपेक्षा जास्त जाड असते.
भारतात राखी खाटिक च्या तीन उपप्रजाती आढळतात. त्यापैकी विदर्भात आढळणारी
प्रजातीचे शास्त्रीय नाव Lanius excubitor lahtora आहे. आता यामध्ये थोडा गोंधळ आहे. ग्रीमीटच्या पुस्तकानुसार
राखी खाटिक चे शास्त्रीय नाव Lanius meridionalis आहे. तर पामेला रासमुसेन च्या नुसार Lanius excubitor lahtora आहे. यावर शास्त्रीय वर्गीकरणाच्या
बाबतीत अजूनही संशोधन चालू आहे. विदर्भात आढळणाऱ्या ईतर दोन स्थानिक जाती Long-tailed Shrike (लांब शेपटीचा खाटिक) व उदी
पाठीचा खाटिक (Bay-backed
Shrike) या
दोघांचाही मुख्य अधिवास गवताळ माळरान असले तरी गावाच्या व शहराच्या आसपास यांनी
जुळवून घेतल्याने त्यांचा आढळ सर्वदूर दिसून येतो. त्यामुळे त्यांची संख्याही राखी
खाटिक च्या तुलनेत जास्त आहे. खुरटी गवताळ माळरान चे प्रमाण पूर्ण विदर्भातच आहे. खाटिक
हा खुरटी जंगल, गवताळ माळरान, शहर व गावाजवळील मोकळा भाग, शेतीचा भाग, खुरटी
जंगलाजवळ असलेला शेतीचा भाग, खुरटी जंगलाजवळ असलेल्या माळरान सोबत टेकडयाचा भाग या
अधिवासात दिसतात. या सर्व अधिवासाशी लांब शेपटीच्या खाटिक ने जुळवून घेतले आहे.
त्यापाठोपाठ उदी पाठीच्या खाटिकचा नंबर लागतो. व यातील केवळ एक-दोन अधिवासात
आढळणारा काहीसा एकलकोंडा वाटणारा राखी खाटिक शेवटी येतो.
राखी खाटिक
मध्ये नर मादी दिसायला अगदी समान असतात. प्रजनन एप्रिल ते जुलै पर्यंत दिसून येते.
माळरानावरील हीवर चे काटेरी झाड घरट्यासाठी जास्तकरून निवडले जाते. ज्याची ऊंची
चार ते साहा फुटापर्यंत असते. हिवर चे झाड माळरानावरील मजबुत व काटेरी असल्यामुळे
घरट्याला बरेच सरक्षण मिळते. जास्तीची केलेली शिकार टांगून ठेवायलाही हीवर सारख्या
मजबूत झाडाच्या काट्याचा उपयोग होतो. घरटे बहुधा रस्त्याच्या कडेला असलेल्या
झाडावरच केले जाते. सुकलेल्या काड्या-काटी, पिसानी बनवलेल्या घरट्यात चार ते पांच अंडी दीली जाते. पिलांचे
पालनपोषण दोघेही करतात पिले लाहान असतांना दर सात मिनिटांच्या अंतराने त्यांना
कीडे कीटक भरवले जातात. थोडे मोठे झाल्यावर सरडे उंदीर भरवले जाते. कुणी शिकारी
पक्षी अथवा साप घरट्याजवळ आल्यास त्याचा हाकलून लावले जाते. त्याबाबतीत राखी खाटिक
अगदी रागीट आहे. कर्कश्य असा आवाज काढून शत्रूचा मुकाबला केला जातो. त्या आवाजातून
त्याच्या रागीट स्वभावाची पुरेपूर कल्पना येते. मात्र मिलनकाळात मादीला आकर्षित
करण्यासाठी ईतर पक्षांच्या नकला करीत मंजुळ आवाजही तो काढतो. प्रजननाचा काळ जर
सोडला तर हा एकटेच राहणे पसंद करतो. खुरटी जंगलाजवळ असलेल्या टेकड्यांच्या भागात व
वीस्तीर्ण गवताळ माळरान सोबत थोडाफार शेतीचा भाग येथे त्यांचे प्रमाण बऱ्यापैकी
आढळते. या अधिवासाचे प्रमाण कमी असल्याने त्यांची संख्याही फार कमी आहे. खाटीक
कुळातील पक्षी बसण्यासाठी, शिकार करण्यासाठी जास्तकरून रस्त्यावरील तारेचा उपयोग (कदाचित पर्याय
नसल्याने) करतात. शेताच्या बाजूने गेलेल्या रोड वर उंदराना पकडणे सोयीस्करही असते.
पण माळरानावरील छोटी झाडे झुडपे शीकारीसाठी त्यांना जास्त उपयोगी पडतात. त्यांना
आपल्या शिकार चे निरीक्षण व त्यावर झडप टाकण्यासाठी घेण्यात येणार्या
पवित्र्यासाठी छोटी व मजबुत झाडे झुडपे सोयीची असतात. जी माळरानावरच दिसून येतात. प्रत्येक
शहर आणी गावाच्या बाहेरच्या माळरानाचा विचार जर केला तर राखी खाटिक दिसण्याची जागा
अगदी बोटावर मोजण्या ईतपत उरल्या आहे. आणी त्यांची संख्याही. मुख्य मुद्दा हा आहे
की राखी खाटिक ची संख्या मुळातच कमी नाही तर त्यांच्या कमी-कमी होत असलेल्या
अधिवासामुळे त्यांचे प्रमाण कमी होत आहे. व आपल्या ईतर खाटिक बंधुसारखे सगळ्या
अधिवासाशी जुळवून घेता न आल्याने त्यांच्यावर एकेदिवशी दुर्मिळ होण्याची पाळी येऊ
शकते.
किरण मोरे
9923910034
Comments
Post a Comment