दुर्लक्षीतांचे धनी -चंडोल प्रजाती

 

                                                                                       

 

Ashy-Crown Finch Lark (चिमण चंडोल/डोंबारी)

    मंध्यतरी मराठा समाज आरक्षण हा मुद्दा खूप गाजला. मराठा समाज व त्यातील जाती मोठ्या प्रमाणात असूनसुध्द्धा त्याकडे शासनाचे होणारे दुर्लक्ष, नव्वद टक्के मराठा समाज शेतीवर अवलंबून असूनही सरकारची शेतीबद्दलची अनास्था यामुळे मराठा समाजातील दुर्लक्षीत जातींना वाचवायचे असेल तर त्यांना आरक्षण मिळायलाच हवे या मागण्यासाठी चर्चा झाल्या,सभा रंगल्या,ठीकठीकानी मोर्चे निघाले व त्यांनी शासनाला आपली दखल घ्यायला भाग पाडले. त्याचे राजकारण झाले असो वा नसो पण मराठा समाजातील सर्व जाती काळाच्या मुख्य प्रवाहात टिकून राहण्यासाठी एकत्र आल्या. दुर्दव्याने पक्षांच्या जगात असे घडू नाही शकत. त्यांना स्वतःला वाचवण्यासाठी एकत्र येणे जमणार नाही वा शासनाचा दरवाजा ठोठावता येणार नाही. त्यांच्यासाठी मानवालाच काही प्रयत्न करावे लागतील. पक्षीजगात मोठे वा आकर्षक पक्षीच आपले लक्ष वेधून घेतात त्यांच्या अधीवासावर शासनाचा राजाश्रय मिळतो. पण छोटे,अनाकर्षक पक्षी किंबहुना सगळीकडे आढळनारे पक्षी दुर्लक्षीतच राहतात. पर्यायाने त्यांचा धोक्यात येणारा अधीवास सुद्धा विरळ होत जातो॰ त्यात चंडोल(अलाउडीडी)(लार्क)कुळातील पक्षांचा कदाचीत प्रथम क्रमांक लागेल. त्यांच्याकडे लक्ष न जाण्याचे मुख्य कारण त्यांचा छोटा आकार,भुरकट मातकट रंग हा आहे. पण त्यांच्या काही लकबी, विणीच्या हंगामातील करामती लक्षात घेतल्या तर आपण त्यांना सहज ओळखू शकू.

Indian Bushlark (लाल पंखी चंडोल)

     सर्वात प्रथम मोठ्या प्रमाणात आढळणारा चीमण चंडोल(अशी क्राऊन स्परो लार्क) बद्दल जाणून घेऊया.हा बसकट आकाराचा चीमणीपेक्षा लहान असतो. मादीचा रंग सरसकट वाळूसारखा तपकिरी तर नर खालून पूर्णपणे काळा. रंगाने पुर्णपणे जमिनीशी समरस असल्याने ते सहसा दिसून येत नाही पण विणीच्या हंगामात मादिसाठी गाणे म्हणत हवेतील करामती दाखवीताना हा सहज ओळखू येतो.हवेत २५ मीटरपेक्षा उंच एखाद्या रॉकेट सारखा वर जातो व पंख मिटून खाली सुर मारतो.जमीनीजवळ आल्यावर परत आपल्या वेगाचा फायदा घेऊन तो परत उलटा थेट वर जातो तेथून पुन्हा सुर मारतो.प्रत्येक सुर मारण्याच्या वेळी आपल्या छोट्या लकेर्‍या व लांब स्वरामध्ये सी ई ई ई.. ई. ई.असे गाणे गातो. उघड्या माळरानावर,नापीक प्रदेशात हा जोडीने दिसून येतो.  तुरेबाज चंडोल(साईक्स लार्क)मात्र साहा-सात च्या समूहाने दिसतो.आकाराने चीमणीएवढा. भुरकट,मातकट रंगाचा हा पक्षी आपला डोक्यावरचा तुरा डौलाने मिरवतो. त्याच्या आजूबाजूच्या सर्व पक्षांची नक्कल हा हुबेहूब करू शकतो. प्रजनन काळात(जुलै ते सप्टेंबर)आकाशात तीस मीटरपेक्षा वर जाऊन पंखाची अखंड उघडझाप करत सलग दहा ते वीस मीनीट गाणे गाण्याची कला या जातीत आहे.  तर लालपंखी चंडोल(इंडीयन बुशलार्क)आपल्या विमान स्टाईल साठी प्रसीध्द आहे. प्रजनन काळात गाण्याच्या स्वरातील चढ-उतार करीत हा आकाशातून खाली उतरताना पंख विस्तारून अगदी स्थीर ठेवून विमानासारखा जमीनीवर उतरतो.आकाराने चीमनीएवढाच,डोक्यावर छातीवर काळे ठिपके व पंखावर लाल भागाने हा ओळखू येतो.छोट्या बुंध्यावर,तारेवर बसून याचे मादीसाठी अखंड गायन चालू असते.

Sykes Lark (साईक्सचा चंडोल)

    चंडोल कुळामध्ये गवई चंडोल(सींगीग बुशलार्क)हा गायनासाठी प्रसीद्ध आहे. तसा तो नावाने सर्वांना परीचीत आहे पण तीतकाच दुर्मिळ सुद्धा आहे. असतो तो लालपंखी चंडोल सारखाच पण डोक्यावर,छातीवर काळे ठीपके नसतात. बुंध्यावर बसून किंवा आकाशात विहार करतांना याचे मादिसाठी अखंड गायन चालू असते. त्याचे गाणे कधी तुटकपणे तर कधी मंजुळ शीळ वाजवल्यासारखे वाटते. वीणीच्या हंगामात प्रामुख्याने जून ते सप्टेंबर मध्येच याची हजेरी जाणवते बाकी वर्षभर तो भूमीगत असल्यागत गायब असतो. चंडोल कुळातील सर्वात वेगळा पक्षी म्हणून गोरली चंडोल(रुफस टेल लार्क) ओळखला जातो. चीमनीपेक्षा मोठा,गडद तांबूस रंगाचा व जाड चोचीचा हा चंडोल सहसा दगडी माळरानावर दिसून येतो. जमीनीवर हा कधी ईकडे तर कधी तीकडे असा झीग-झग स्टाईलने खाद्य टिपताना दिसून येतो.गोरली चंडोल चे गाणे अगदी आनंददायी असते ते प्रश्नोत्तराच्या स्वरुपात गायले जाते एका माथ्यावर नर बसून गातो तर दुसर्‍या माथ्यावरुन मादी त्याला प्रतीसाद देते. हे झाले स्थानीक रहिवासी या कुळातील काही परदेशी पाहुणे विदर्भात हिवाळी पाहूणचारासाठी अफगानीस्तान,बलूचीस्तान येथून येतात. आखूड बोटाचा चंडोल(ग्रेटर शॉर्ट-टोड लार्क) ची नोव्हेंबर ते मार्च महिन्यात सर्वच तलावाच्या काठी हजेरी दिसून येते.हुबेहूब चीमणीसारख्या दिसण्यार्‍या या जातीचा थवा १० पासून ४०० पर्यन्तच्या संख्येत आढळून आला आहे. तळ्याच्या काठी बारीक आवाजाचा चिवचिवाट करत गवत्यातल्या बिया टिपताना या नेहमीच दिसून पडतात एखाद्या वर्षी त्यांच्या थव्यामध्ये हुम्स चा चंडोल(हुम्स शॉर्ट-टोड लार्क)हा परदेशी पाहुणा सुद्धा आपली हजेरी लावून जातो. अशा या चंडोल कुळातील विविध जाती आपल्या आजुबाजुने वावरत असूनही दुर्लक्षीत राहतात.त्यांची ओळख पटवून संपूर्ण शास्त्रीय अभ्यास करणे गरजेचे आहे त्यावरून त्यांना भेडसावण्यार्‍या प्रश्नाची आपल्याला कल्पना येवू शकेल.

Singing Bushlark 

     माळरान,मोकळे मैदान,नापीक प्रदेश हे चंडोल जातीचे घरट्यासाठी  व उदरर्भरणासाठी हक्काचे अधिवास पण  निरुपयोगी जमीन अशा सरकारी नामकरणाखाली झालेल्या शोषणाने माळरानाचे तीन तेरा केले आहे. अनिर्बंध कारखानदारी त्यापाठी आलेले शहरीकरण,विकास योजना यासाठी जमीनीची गरज भासू लागली व त्यासाठी माळरान,नापीक जमीनीला लक्ष करण्यात आले. परिणामी मोठ्या प्रमाणात शहराभोवतालची माळराने संपून तीथे सीमेंटचे जंगल व कारखाने उभे राहीले. ज्या पक्षांच्या जाती आपल्या घराच्या आजुबाजुने दिसायच्या त्यांना पाहण्यासाठी १५ -२० किलोमीटरवर दूर जावे लागते. याचा अर्थ काय तर मोठ्या प्रमाणात दिसण्यार्‍या जाती आता विरळ होत चालल्या आहे. त्यात चंडोल सारख्या छोट्या व अनाकर्षक पक्षांची तर गोष्टच नीराळी. याला जबाबदार केवळ राजकीय अनास्थाच नाही तर आपण सुद्धा आहोत. मानवी समाजासोबत पक्षांनापण आरक्षण मिळायलाच हवे. त्यासाठी आदयोगीकरण,राजकारण,विविध विकास व आपली जीवनशैली पर्यावरणपूरक करणे गरजेचे झाले आहे.

Greater Short-toed Lark (आखूड बोटाचा चंडोल )


Comments

Post a Comment