स्टेपमॉम
Large-grey Babbler Feed Common-hawk Cuckoo Chick
म्हणतात
की जन्मदात्यापेक्षा पालनकर्ता श्रेष्ट असतो. जन्म देणे एकदाचे सोपे पण पूर्ण संगोपन
करण्यात खरी कसोटी लागते. म्हणूनच मानवी समाजात जन्म देणार्या आईपेक्षा स्टेप मॉम
(संगोपन करणारी माता) चे तीतकेच महत्व मान्य केले जाते. मात्र पक्षीविश्वामधील
जन्मदात्या आईच्या चातुर्याचे गुणगान जास्त गायले जाते व पालनकर्त्यावर जास्तकरून
मूर्खपणाचाच शिक्का बसतो. हे घडते पक्षांमधील Brood
Parasitism(पिले परोपजीवी) मध्ये.
तसा हा गहन व अथांग असा विषय त्यावर संशोधन अजूनही चालू आहे. यामध्ये कोकीळप्रजाती
मधील कोकीळ स्वत: घरटे बांधत नाही. ती आपली अंडी दुसर्याीच्या घरट्यात देतात.
घरट्यामध्ये अंडे असतांना संबधीत पक्षी पालकांची नजर चुकवून हे अंडे दीले जाते.
अंड्यातून निघालेले पिलु सर्वप्रथम ईतर अंडी अथवा पिले घरट्याच्या बाहेर फेकतात.
कदाचीत तशी त्याला उपजतच बुद्धी (अथवा कुबुद्धी म्हणा) असते. तेथील घरटी मालक नर
मादी हे आपलेच लेकरू म्हणून त्याला वाढवतात. यामधील पालनकर्त्या आईवडिलांचा विषय
त्यातही जास्त पुढाकार घेणार्या स्टेप मॉम. जी स्वत:च्या पिलांच्या प्राणाची आहुती
देऊन (नकळत का असेना) दुसर्या च्या पिलांना वाढविते. दोघेही पिलाची जरी काळजी घेत
असले तरी मादीचा पुढाकार व मेहनत ही जास्तच असते. पक्षीविश्वामध्ये दरवर्षी
पावसाळ्यात गायन व दुसर्यााच्या घरट्यात प्रजनन करणारी कोकीळ प्रजातीची जशी दखल
घेतली जाते. तशीच पालनकर्ते आईवडील व त्यातही मातृत्व खर्याी अर्थाने जगणार्या या स्टेप मॉमची दखल
घेणे अनिवार्य आहे. त्यातीलच काही आपल्या आजुबाजुने दिसणार्याळ स्टेप मॉम बद्दल
जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
सर्वसामान्यपणे दिसणारे उदाहरण म्हणजे कोकीळ (Asian koel) यांचा अधिवास जास्तकरून मानवी वस्तीजवळ असल्याने बरेचदा कावळा कोकीळच्या पिलाला भरवितांना दिसतात. कावळ्यामध्ये पालक आणी पाल्याचा आकार हा बर्याकचअंशी समान असतो. कोकीळ नर व कावळ्याचा रंगही अगदी सारखेच दिसतात. कोकीळ नर संबधीत पालकाची खोड काढतो त्याला हुसकावून लावण्याच्या उद्देशाने घरटे सोडलेल्या दाम्पत्याच्या त्या वेळेत कोकीळ
मादी तिथे आपले अंडे देते. आणी पक्षीविश्वामधील
हुशार पक्षी अशी उपाधी मिळालेला कावळा कोकीळचे अंडे कुठलाही संशय न घेता आपले
मानतो. बरेचवेळा कोकीळचे पिलु मोठे झाल्यानंतर त्याला समस्त कावळेप्रजाती कडून
त्रास झालेला दिसून येतो. कदाचीत मोठे झालेल्या पिलाचा आवाज एकून हे आपले मूल नाही
याची कुणकुण स्टेप मॉमला लागत असावी. जांभळ्या पुठ्याचा शिंजीर (purple-rumped Sunbird) मधील
स्टेप मॉमची कथा वेगळीच आहे. यामध्ये तीचे सावत्र मूल तीच्याहून तिपटीने मोठे
असते.
![]() |
Purple-rumped Sunbird female feed Grey-bellied cuckoo chick |
कारुण्य
कोकीळ (Grey-bellied Cuckoo) हा त्याच्या प्रजातीतील आकाराने सर्वात छोटा कोकीळ.
पण शिंजीरच्या मानाने मोठाच. पावसाळ्याच्या सुरवातीला त्याच्या गाण्यात येणार्याी
आवाजात अतीशय कारुण्य दाटलेले वाटते. शिंजीरचे घरटे झाडाला टांगत्या स्वरुपात
असते. घरट्याचा आतील आकार कोकीळचे जेमतेम एक अंडे मावेल एवढा असतो तरीसुद्धा यात
कारुण्य कोकीळची मादी आपले अंडे त्यात देते. त्या अंड्याला उबवीने व त्यातून
निघालेल्या मोठ्या पिलाची मोठी भूक भागवीतांना दोघांचीही दमछाक होते. दर दोन
मीनीटांनी आपल्या राक्षसी आकाराच्या पिलासाठी खादय शोधून त्याला भरवताना स्टेप
मॉमच अग्रेसर असते.
नेहमी
सात ते आठच्या संख्येत राहणारे जंगली सातभाई (Jungal
Babbler) चे घरटे म्हणजे सांघीक
सहचर्याचा एक उत्तम नमूना असतो. यामध्ये घरट्याला सर्वजण मदत करतात. पीलाना
वाढविण्यातही सगळ्यांचा हातभार असतो. नेमक्या याच बाबीचा चातक (Pied Cuckoo) कडून
गैरफायदा घेतला जातो. हा पक्षी केवळ विणीसाठी दूरवरून स्थलांतर करून येतो. जोडीदार
मिळाल्यानंतर सातभाईचे घरटे हेरून त्यात दोन अथवा तीनही अंडे दिले जाते. आणी
कधीकधी चातकच्या तीन पिलांना व्यवस्थीत वाढवीतांनाही सातभाई दिसून येतात. ईथे
मात्र चातकच्या पिलाला भरवितांना स्टेप मॉम एकच्या वर दिसून येतात. बरेचदा
चातकच्या पिलासोबत सातभाईचे पिलुसुद्धा मोठे झालेले दिसते. बरेचदा चातक पक्षी आपली
अंडी लांब शेपटीचा खाटीकच्या(Long-tailed Shrike) घरट्यात सुद्धा घालतांना दिसतात. पण त्याचे प्रमाण
फारच कमी आहे. आणखी एक राखी सातभाई (Large-bellied
Babbler) या प्रजातीला कोकीळ
प्रजातीतील पावश्या (Common hawk cuckoo) कोकीळ कामी लावतो. ईथेही आकाराने मोठ्या असलेल्या
आपल्या पिलाची काळजी सामुहीकरीत्या घेतली जाते. भारतीय उपखंडात सोळा प्रकारच्या
कोकीळ प्रजाती आढळतात. आणी त्यांच्या पिलांची जबाबदारी घेणार्याव पक्षीप्रजाती
त्याहून जास्त आहे. पक्षीविश्वातील Brood
parasitism या अनोख्या प्रकारात
बर्या्च गोष्टी अद्याप उजेडात यायच्या आहेत. पण एक खरे पक्षांमधील काही मादी
आपल्या एका जीवनात मॉम व स्टेप मॉम अशा दोन्ही भूमीका पार पाडतात.
Comments
Post a Comment